भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - १

पुनश्च    रोहन नामजोशी    2019-09-09 09:30:21   

व्हॅलेंटाईन डे च्या आसपास घडणाऱ्या प्रेमकथा आपण नेहमीच ऐकतो आणि वाचतो. पण भाद्रपदातील गणपतीसारख्या उत्सवी वातावरणांत देखील अनेक प्रेमकथा उमलत आणि फुलत असतात. उत्सवाच्या नादांत आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र आपल्या बारीक आणि मिश्कील नजरेने या गोष्टी पाहणारा लेखक, धार्मिकतेच्या सणाला लाभलेली गुलाबी किनार अचूक टिपतो आणि ती कथाबद्धही करतो. बीबीसी मराठीचे पत्रकार आणि लेखक रोहन नामजोशींच्या अशाच कथामालिकेचा पहिला भाग वाचा आज. ********** प्रतिष्ठापना शार्दूल आणि ओवी च्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा गणेशोत्सव होता (म्हणजे आहे) दोघांना एकमेकांबद्दल मैत्रीच्या पलीकडे काहीतरी वाटतं याची कॉलेजच्या या शेवटच्या वर्षाला खात्री पटली आहे . आता पुढे काहीतरी विचार करायचा असेल तर घरच्यांचा अंदाज घ्यायला हवा या उद्देशाने ओवीने शार्दूलला आज 'दर्शना' ला बोलावलं. मागच्या आठवड्यापासून आजच्या खास दिवसाची तयारी दोघांनी सुरू केली होती. शार्दूल ने fab मध्ये जाऊन एक विशेष कुर्ता घेतला होता. २०-२५ ऑप्शन ट्राय केल्यानंतर ओवीने ज्या कुर्त्याला मान्यता दिली तोच त्याने घेतला. अखेर आज संध्याकाळी शार्दूल प्रभात रोड वर असलेल्या तिच्या बंगल्यात आला. घरासमोर हश पपिज, मोची, मेट्रो च्या चपलांचा खच पडला होता. बाटाच्या काही अंगठ्याच्या चपलाही त्यात होत्या. त्यावरून घरातल्या मंडळींच्या वयाची रेंज त्याच्या लक्षात आली. घरात शिरताच उदबत्ती, गजरे, झेंडूची फुलं, उंची अत्तरं, बटाट्याची भाजी यांचे मिश्र सुवास त्याच्या नाकात शिरले. त्याला अगदी प्रसन्न वाटलं. तसा तो ओवीकडे नेहमीच यायचा. ओवीचे आई वडील त्याच्या अगदी चांगले ओळखीचे होते. तरी आजचा दिवस वेगळा होता. आज तो स्वतःच उमेदवा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , सोशल मिडीया

प्रतिक्रिया

 1. mahesh phadke

    2 वर्षांपूर्वी

  पुढे काय होणार हे वाचण्याची उत्सुकता निर्माण होते आहे.

 2. Rdesai

    2 वर्षांपूर्वी

  छान !

 3. MaheshKhare

    2 वर्षांपूर्वी

  एकदम समकालीन कथा! मध्यमवर्गीय वातावरण चपखलपणे आलं आहे. पुढे काय होणार हे वाचण्याची उत्सुकता निर्माण होते आहे.

 4. ambarishk

    2 वर्षांपूर्वी

  :)वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen