भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ५

पुनश्च    रोहन नामजोशी    2019-09-13 09:30:04   

सवाष्ण *** इनामदारांचा कारभार अगदी देशस्थी पद्धतीचा होता. एक तर घराणं खूप मोठं, त्यात सगळ्या गोष्टींची प्रचंड हौस, गौरी गणपतीला तमाम इनामदार मंडळी पुण्यात येत असत. सातही दिवस गप्पांचे फड, भरपूर काम, संपूर्ण परिसर दणाणून सोडणार्या आरत्या, जागरणं खाणं हे सगळं वर्षानुवर्षे चालत होतं. हे वर्षही त्याला अपवाद नव्हतंच. शार्दूल ची सगळे चुलत,आत्येभावंडं यावर्षीही आली होती. त्यातली काही पुण्यात राहायची, काही सातारला तर काही कोल्हापूरला राहायची. पुण्यात राहणार्‍या लोकांबद्दल पुण्याबाहेरच्या लोकांना विशिष्ट प्रकारचा हेवा असतो. तसा तो इनामदारांकडे सुद्धा होता. प्रत्यक्ष बोलण्यात जाणवत नसलं तरी वागण्याबोलण्यातून कळायचं. पुणेकरांची चेष्टा करणं हा इनामदारांचा आवडता उद्योग होता. शार्दूलला त्याचं सगळ्यात जास्त टेन्शन होतं तसाही शार्दूल नाही म्हटलं तरी अस्वस्थ होताच. पहिल्या दिवशीच्या पराक्रमानंतर त्याची झोप उडालीच होती. तरी त्याला मजा वाटत होती. लग्नानंतर आपल्या 'हिट लिस्ट' वर कोण आहे याची यादीही त्याने मनोमन तयार केली होती. ओवी आज फक्त मैत्रीण म्हणून येणार असली तरी चाणाक्ष नातेवाईकांची कमतरता कोणत्याच समारंभात नसते. त्यामुळे ही लपवाछपवी करणं तसं जड होतं. तरी हे सगळं झेलायला तो तयार होता. गालावर खसाखसा after shave lotion घासत आजच्या दिवसात काय वाढून ठेवलंय याचा तो विचार करत होता. दिवस चढू लागला तशी पाहुण्यांची लगबग वाढली. बाहेर गुरुजींचा तारस्वरात मंत्राचा जयघोष चालू होता. घरातल्या ज्येष्ठ आणि अनुभवी बायका स्वयंपाकघरात आजच्या विशेष जेवणाचं सगळं बघत होत्या. बाहेर पुरुष मंडळी अंघोळी वगैरे करून 'सकाळ' आणि 'म.टा' च्या घड्या एकमेकांना सरकवत होते. बाकी व्हॉट्सअॅप वर म ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , कथा , सोशल मिडीया

प्रतिक्रिया

  1. mahesh phadke

      2 वर्षांपूर्वी

    suruvat tar chan zaliy....

  2. Rdesai

      2 वर्षांपूर्वी

    मस्त -----वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen