सुरती रुपया आणि यशाचे गणित (ऑडीओसह)


अंक : श्रीदीपलक्ष्मी, जानेवारी १९५९ 

लेखाबद्दल थोडेसे : मराठी चित्रपट समीक्षेच्या क्षेत्रात 'खटकेबाज संवाद' या शब्दसमुहाचा जन्म दिनकर द. पाटील यांनी लिहिलेल्या संवादांमुळे झाला होता.  त्यांच्या चित्रपटांत पडद्यावरील व्यक्तिरेखांचे सवाल-जवाब म्हणजे जणू शब्दांचे फटाके असत, त्यातूनच पाटलांनी लिहिलेल्या संवादांचा उल्लेख  नेहमी 'खटकेबाज संवाद' असा होऊ लागला. असे संवादी 'खटके' लिहिण्यासाठी लेखकांत युक्तीवाद-प्रति युक्तिवाद करण्याची विलक्षण ताकद असावी लागते. पाटील यांच्या अशा ताकदीचा अंदाज आजचा हा लेख वाचताना येतो. विषय़ खूप साधा आहे. शिक्षण क्षेत्रात (तेंव्हापासूनच ) आलेली, मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडू द्यावे अशी टूम आणि यश म्हणजे नेमकं काय? या प्रश्नांच्या उत्तरात शिरताना पाटलांनी अशी काही चौफेर टोलेबाजी केली आहे की आपण लेखाच्या पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत कधी पोचतो ते कळतच नाही.  तुम्ही स्वतःच अनुभव घ्या ना..

आणि हो, लेखाच्या शीर्षकात सुरती रूपया आहे, लेखातही हा शब्द आलेला आहे. तेंव्हा सहज उत्सुकता जागी झाली असेल तर सुरती रुपयाविषयी ही रंजक माहिती वाचा, म्हणजे पाटलांनी त्यांच्या लेखात तो शब्दप्रयोग का केला तेही आपल्याला कळेल-

१७व्या शतकाच्या मध्याला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुरत हे बंदर ह्या व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनले. सुरतेत धनाढ्य व्यापाऱ्यांचा राबता सुरू झाला. शाहजहान आणि औरंगझेब ह्या बादशाहांच्या काळात सुरतेची टांकसाळ 'रुपया'चे सर्वाधिक उत्पादन करू लागली. धातूची शुद्धता आणि वजनाची हमी ह्या बाबतीत 'सुरती' रुपया विश्वसनीयतेचे जणू प्रतीक बनला. सुरती रुपयाच्या विश्वसनीयतेमुळे डचांनी १७ व्या शतकाच्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चिंतन , अनुभव कथन , श्रीदीपलक्ष्मी

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.