खरेदी


“तुमच्याकडे वॅक्युम क्लीनर आहे?” “आहे.” “कधी घेतलात?” “झाली की १५-२० वर्षे” “व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला आठवतो का?” “झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता बहुतेक” “आता कुठे असतो.” “माळ्यावर असेल बहुदा. हिला माहित असेल.” “मग नेहमी लागत नाही घर वॅक्युम करायला?” “अहो तो वापरण फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन.” “पण मग घेतला कशाला?” “अहो एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.” “म्हणजे तुम्ही आपण होऊन घातली ओवाळणी?” “नाही चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला. मेव्हणी म्हणाली जाळ्या जळमटे फार छान निघतात.” “काय सांगता मग नसतील जाळ्या जळमटे तुमच्या घरात?” “नाही हो कोणीही तो वापरायला नको म्हणत्तात. फार उस्तवार करायला लागते त्याची. सुरवातीला मुलं भांडायची तो वापरायला. मग उत्साह गेला. आता हीच मला म्हणते कधीतरी अहो तो वॅक्युम क्लीनर लावून जाळ्या काढून द्या ना.” “मी म्हणतो तिला तूच कर. तर म्हणते कशी हे पुरुषांचं काम आहे.” “म्हणजे तुमच्याच अंगावर पडलं म्हणायचं.” “मी नाही म्हणतो. त्यापेक्षा कुंचा घेतो आणि स्टूल घेऊन सोयीचं होतं.” “मेव्हणी वापरते का?” “नाही विचारलं कधी. तिला काही विचारायची सोय नाही तिने काहीतरी नवीन घेतलेलं असतं आणि इकडे वाटतं आपल्याकडेही असावी ती वस्तू.” “बरं आता ते जाऊन ध्यात.” “ही व्यायामाची सायकल दिसते आहे तुमच्याकडे. करता की नाही व्यायाम.” “नाही हो टॉवेल वाळत घालतो तिच्यावर.” “काढूयात त्यावरचा टॉवेल? अरेच्चा टॉवेलच्या ओलीमुळे गंजून गेली आहे हो. सायकल.” “अहो मुलांसाठी आणली पण वापरतील तर शपत.” “बरं आणली तेव्हा मुलगा किती वर्षाचा होता.” ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सोशल मिडीया , श्रीकांत कुलकर्णी , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. maheshbapat63

      3 वर्षांपूर्वी

    नेहमीचीच समस्या। मी ठरवले आहे 4 वस्तु बाहेर काढायच्या मगच नवी आवश्यक वस्तू आणायची। एका वर्षात घर खूप वाटू लागलं।

  2. किरण भिडे

      3 वर्षांपूर्वी

    धीरज जी, सोशल मिडिया सदरात असे लेख आपण archive करतो जे whatsapp/facebook वर खूप चालले. काही महिने/वर्षांनी थोडं अप्रूप वाटतं ते लेख पुन्हा बघताना...

  3. shriramclinic

      3 वर्षांपूर्वी

    हा लेख WhatsApp आणि फेसबुक वर अनंत वेळा आलाय. इथे येणं अपेक्षित नव्हते

  4. Sharadmani

      3 वर्षांपूर्वी

    मस्त लेख आहे. आजवर खरेदी या विषयात महिलांना अकारण लक्ष्य केले आहे. पण पुरुषही या विषयात काही कमी नाहीत असे माझे निरीक्षण आहे.

  5. Manjiri Vaidya

      3 वर्षांपूर्वी

    हे सगळं वाचून माझं बरंच बरं आहे असं वाटून राह्यलंय ब्बा. :) बाकी लग्नातल्या खरेदीबद्दल न बोललेलंच बरंय. मस्त लिहिलंय.

  6. anudeep

      3 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे

  7. Pravin

      3 वर्षांपूर्वी

    Apratimch.khup kahi sangun , shikoun gelat.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen