तरुण मुले सैराट का वागतात

लेखक: डॉ यश वेलणकर

ओजस बारावीला आहे. तो क्लासला जायला म्हणून घरातून बाहेर पडला, पण अर्ध्या तासाने त्याच्या आईला फोनवर त्याचा मेसेज आला की मला अभ्यासाचा कंटाळा आल्याने मी वाईल्डलाईफ अनुभवायला रणथांबोर येथे जात आहे. आई हा मेसेज पाहून चक्रावली. खात्री करण्यासाठी तिने क्लासला फोन लावला. क्लास मालकाने त्यांच्या वर्गात पाहिले आणि ओजस आलेला नाही असे सांगितले.ओजसच्या आईने मेसेजची हकीकत त्यांना सांगितली.सोबत कोणतेही सामान न घेता ,कोणतीही पूर्व तयारी न करता हा अचानक असा निघून गेल्याने नक्की काय करायचे हा दोघानाही प्रश्न पडला होता. त्यांनी आत्ता रणथांबोरला जाणारी ट्रेन आहे का पाहिले, ती होती. मग त्यांनी पोलिसांना कळवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ओजस रणथांबोरला पोचला त्यावेळी त्याचे स्वागत करायला तेथे पोलीस होते. ते त्याला पुन्हा घरी घेऊन आले. पौगंडावस्थेतील बरीच मुले अशी सैराट वागतात. प्रेमात पडून किंवा थ्रिल म्हणून घरातून पळून जातात, छोट्या छोट्या कारणांनी हिरमुसतात, मोबाईल गेमच्या नादाला लागून रस्त्याने धावत सुटतात, काहीजण तर आत्महत्याही करतात. का वागतात या वयातील मुले अशी? त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? सध्याच्या सोशल मेडियाचा हा परिणाम आहे का?

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 19 Comments

 1. Potdar100

  छान ..

 2. ssaptarshi

  धन्यवाद ! उपयुक्त माहिती सोप्या मराठी तून मिळाली!

 3. Rahul

  खुपच छान

 4. mdurugkar

  लेख बरा वाटला.

 5. 9322496973

  खुप छान आणि आभ्यासपूर्ण असा हा लेख आजच्या तरुणाईला आणि त्यांच्या पालकांना नक्कीच मार्ग दर्शक आहे.

 6. ambarishk

  nehemi pramanech mihitipurna lekh! Tumche lekh vachun majhyat manasshastra baddal avad nirman zali aahe.

 7. Monika

  खूपच छान लेख. सर्व पालकांनी वाचायला हवा. उपयोगी माहिती आहे.

 8. Monika

  खूपच छान लेख. सर्व पालकांनी वाचायला हवा. उपयोगी माहिती आहे .

 9. raginipant

  सुंदर लेख……
  गरज आहे ती मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी वाचण्याची..

Leave a Reply