fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

हसण्यावारी – भाग ३

 

इथे हे नवरा बायको बहूतेक प्राणीसंग्रहालयात चिंपाझीच्या समोर उभे आहेत. चिंपाझी मादीच्या कडेवरचं तिचं मूल या ‘माणसा’कडे झेप घेतं आहे हे पाहून आपल्याला हसू येतं आणि त्या माणसाच्या बायकोकडे लक्ष जाताच संशय-तर्क-वितर्कात आपण गुरफटून जातो. फ्रेंच व्यंगचित्रकार Chaval यांचे हे व्यंगचित्र. माणसाच्या चेहर्‍याकडे पहाताच पिलाच्या त्या झेपावण्याच्या कारणाचा सुगावा आपल्याला लागतो. त्या पिलाला तो माणूस ‘आपला’च  वाटावा हे स्वाभावीकच; माणसाचा चेहरा दिसतोच आहे तसा- ते उघडच आहे. मग त्या पिलाचं तसं झेपावणं स्वाभावीक असताना, बायकोच्या चेहर्‍यावर खरं म्हणजे आपल्यासारखं हसू यायला पाहिजे; त्या ऎवजी संशयाने का बरं ती पहाते आहे. शिवाय हे प्राणीसंग्रहालय बंदिस्त नाही, पिंजर्‍यांचं- ते आहे ‘मुक्त’ फिरण्याची मुभा असणार्‍या प्राण्यांचं. पण तरीही बायकोला का बरं शंका येते आहे आणि कशाची बरं शंका असावी ती….

बोलण्यापेक्षा मौन अधिक सांगत असतं,हे खरं; पण सांगण्याच्या ऎवजी ते काही सुचवू लागलं तर मोठं तापदायक होतं. पुरूषाला जो योगायोग वाटतो, तोच त्याच्या बायकोला ‘योग’ वाटावा – भोग असतो त्याचा; पुरूषाचा !

मधुकर धर्मापुरीकर 

Leave a Reply

Close Menu