चाळीशी आणि पन्नाशीतल्या कविता


अंक- अंतर्नाद – ऑगस्ट २०१७ स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातील लैंगिक संदर्भ हा सर्वच साहित्यप्रकारात सतत वेगवेगळ्या पद्धतीने येणारा विषय आहे. लैंगिक विषयांवर बोलण्याचा आणि खुद्द लैंगिक व्यवहारातला मोकळेपणा पाश्चात्य समाजात जसा आणि जेवढा आहे तसा तो आपल्याकडे नाही. त्याची विविध कारणे आहेत आणि परिणामही आहेत. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या लैंगिक धारणा बदलतात, अपेक्षा बदलतात आणि व्यवहारही बदलत असतात. या वेगवेगळ्या टप्प्यांचे, भावनांचे स्त्री-पुरुष अशा दोन्ही भूमिकांमधून रेखाटलेले शब्दचित्र म्हणजेच प्रस्तुत कविता होय- चाळिशीतल्या कविता कवी-उत्पल वनिता बाबुराव टू द फ्रेंडस् ! सेन्ट्रल पार्कमधल्या सोफ्यांवर आणि मोनिकाच्या अपार्टमेंटमध्ये जे उलगडतं ते थोर असतं. संवेदनशील सहा जण सेक्सही कसं करेक्ट हँडल करतात हे बघणं मला माझ्या पाच हजार वर्षांच्या जुन्या आसनावरून उद्बोधक वाटतं अशावेळी थोडा वेळ मी विसरतो मॅनहटन कसं उभारलं गेलं असेल हा प्रश्र्न डू टर्कीज एन्जॉय थँक्सगिव्हिंग? हे रॉयबाईचं भाषण. अमेरिकन कन्झ्यूमरिझम आणि अमेरिकन साम्राज्यवादाचं विद्रूप रूप. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या पडझडीबद्दलचे लेख. रेड इंडियन्सचं शिरकाण आणि अमेरिकेतला रेसिझम. या सहा जणांजवळ जरा बरं वाटत असतं.... लग्न करून राहणारे मोनिका आणि चँडलर लग्न न करता मुलीला जन्म देणारे रॉस आणि रॅचेल न्यूयॉर्कमधल्या अनेक मुलींबरोबर रात्र घालवलेला आणि तरीही सेक्स अडिक्ट नसलेला जोई दोन पुरुषांबरोबरच्या नात्याचा गुंता सोडवणारी फीवी आपल्या मैत्रिणींशी त्यांच्या ब्रा साइजबद्दल आणि त्यांच्या हॉट ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , कविता , पुनश्च , उत्पल वनिता बाबुराव

प्रतिक्रिया

  1. ulhas

      5 वर्षांपूर्वी

    समजत नाही नक्की नवीन काय मिळाले? ४०शी वा ५०शीतील कविता बहुदा २५शीतील लोकांसाठी आहेत असे वाटते. उगच वाहवा करण्यास मी धजणार नाही. मला कविता समजलीच नाही हा दोषारोप पत्करतो.

  2. arush

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen