fbpx

नवे वर्ष, नव्या आशा- नेहमीच्याच!

नववर्षाचे संकल्प हे बर्फासारखे असतात, ते पाहता पाहता वितळतात आणि वाहून जातात असे म्हटले जाते आणि हे सत्य सार्वकालिक आहे. गेली शेकडो वर्षे आपण  उत्साहाने नव्या वर्षाचे संकल्प करत आलो आहोत आणि त्याच उत्साहाने ते विसरत आलो आहोत. रमेश मंत्री यांनी त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीत या लेखात हेच सत्य सांगितले आहे. लेख ६० वर्षांपूर्वीचा असूनही तो ताजा वाटतो याचे श्रेय, गेल्या साठ वर्षात अजिबात न बदललेल्या तुमच्या-आमच्या वृत्तीला द्यावे लागेल.

रमेश मंत्री (६ जानेवारी १९२५-१९जून १९९८) यांनी वृत्तपत्रातील उमेदवारीपासून सुरुवात केली आणि ख्यातनाम विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून ते पुढे मान्यता पावले. खुसखुशीतपणा हा त्यांच्या लेखनाचा सर्वव्यापी विशेष होता. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग, कोल्हापुरी चिवडा, हसण्याचा तास पहिला, हास्यधारा, अती झाले अन हसू आले  अशी शंभराहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. १९७९ या एकाच वर्षात त्यांनी ३४ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम केला होता (संदर्भ- मराठी वांड्मय कोष). १९९२ साली कोल्हापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत मंत्रींनी इंदिरा संत यांचा पराभव केला होता. साधारणतः निवडून आलेल्या अध्यक्षांवर वृत्तपत्रे अग्रलेख लिहितात. परंतु संतांचा पराभव झाल्याने महाराष्ट्र टाइम्सचे तेंव्हाचे संपादक गोविंदराव तळवलकर एवढे संतापले होते की त्यांनी पराभूत उमेदवार इंदिरा संत यांच्या गुणगौरवाचा अग्रलेख लिहिला होता. असा मंत्रींचा महिमा.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. वा!! खूपच खुशखुशीत लेख

Leave a Reply

Close Menu