‘माय सन, डू यू वॉन्ट धिस बलून?’ ( ऑडीओसह )

पुनश्च    विलास पाटील    2020-03-21 06:00:01   

अंक - अंतर्नाद, ऑक्टोबर २०१० या पोराला आपण आपल्याबरोबर हॉटेलात आणायला नको होतं हे रॉबर्टला आधीपासून पुरतेपणी ठाऊक होतं. पण त्याच्यापुढं दुसरा पर्यायही नव्हता. आपल्या मैत्रिणीबरोबर आपण दोन दिवस ट्रीपला जाणार आहोत, हे ट्रेसीनं आठवडाभर आधी त्याला सांगून ठेवलं होतं, त्यासाठी तिला कार लागणार होती, त्याबाबत तिनं निक्षून सांगितलं होतं. आठवड्यानंतरची गोष्ट म्हणून रॉबर्टनं तिच्या म्हणण्याकडे फारसं लक्षही दिलं नव्हतं. पण तो दिवस उजाडला आणि सकाळीच बायको कार घेऊन भुर्रकन उडून गेली. आता कुठं एका वास्तवाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे, हे त्याच्या लक्षात आलं. बोस्टनच्या प्लेझंट स्ट्रीटवरून रात्री बारा-साडेबाराला मुलाला घेऊन तो साइडवॉकने चालत होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. हवेत चांगलाच गारठा आलेला होता. हॉटेलातला जादूचा खेळ संपवायलाच त्याला बारा वाजले. त्यानंतर जादूचं सारं सामान हॉटेलच्या नेहमीच्या कपाटात ठेवायला त्याला वीस-पंचवीस मिनिटं तरी लागली. आता रस्त्यावरून चालताना सोबत पोराला घेऊन तो वैतागला होता. पोर नेहमी आईला चिकटलेलं असायचं. पोराला सांभाळणं, त्याला गोंजारणं, त्याला समजावणं, त्याचे हट्ट पुरवणं याचा त्याला तिळमात्र सराव नव्हता. त्या गोष्टींपासून तो दहा हात दूर राही. बायकोनं ते सारं पाहावं हे त्याचं नेहमीचं म्हणणं. ट्रेसीही ते मान्य करूनच चालायची. पण ट्रीपला मुलाला घेऊन जाणं तिला अगदीच अशक्य होतं. म्हणून दोन दिवसांसाठी रॉबर्टवर पोराची जबाबदारी सोपवून ती ट्रीपला गेली होती आणि पोराच्या मुडिस्ट स्वभावाला तोंड देत रॉबर्ट हैराण झाला होता. त्याला हाताला धरून रस्त्यानं जवळपास तो ओढतच चालला होता. रस्त्यानं जाणाऱ्या एखाद्या कॅबला तो हात करत होता, पण त्या त्याच्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , कथा , श्रवणीय

प्रतिक्रिया

 1. atmaram-jagdale

    2 वर्षांपूर्वी

  कथा खूपच सुंदर आहे . थोडया आशयात जास्त परिणाम करणारी आहे . अंतर्नाद हे माझ्या आवडीचे मासिक होतं . आता ते बंद झालं वाटतं

 2. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  छान कथा!?

 3. किरण भिडे

    2 वर्षांपूर्वी

  आपले सभासदत्व २९ डिसेंबर ला संपलंय. नुतनीकरण करा. ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

 4. mhaskarmv

    2 वर्षांपूर्वी

  छान आणि गुंतवून ठेवणारी कथा

 5. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  वाचू शकत नाही फक्त संपादकीय

 6.   2 वर्षांपूर्वी

  मी काहीही वाचू शकत नाही फक्त संपादकीय

 7. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  विचारास चालना देणारा छोटासा पण परीणामकारक लेख

 8. asmitaphadke

    2 वर्षांपूर्वी

  छानच !वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen