माझा ‘लोकल’ गाडीचा अनुभव( ऑडीओसह)

पुनश्च    कमल तेंडोलकर    2020-04-01 06:00:41   

अंक : अनुराधा, डिसेंबर १९६२ मुंबईतल्या लोकलमधली खच्चून भरलेली गर्दी आणि त्या गर्दीतून प्रवास करत कार्यालय गाठताना होणारी धावपळ, दगदग, मनस्ताप आणि ससेहोलपट हे चित्र कधीपासूनचे असेल असे वाटते? पंचवीस-तीस वर्षे? चाळीस वर्षे? छे! १९६२ साली म्हणजे आजपासून तब्बल ५८ वर्षांपूर्वीही आजचीच स्थिती होती. मध्यमवर्गीय गृहिणी जेंव्हा नुकत्याच मोठ्या संख्येने नोकरीसाठी बाहेर पडू लागल्या होत्या तेंव्हाची लोकलमधील गर्दी आणि वातावरण सांगणारा हा 'बोलका' लेख. बोलका म्हणजे डोळ्यांपुढे चित्र उभा करणारा तर आहेच, शिवाय 'बोलका' म्हणजे या लेखासोबतच तो ऐकण्याची सोयही उपलब्ध आहे. तेंव्हा वाचा किंवा ऐका आणि अनुभवा. सौ कमल तेंडोलकर यांचा 'अनुराधा' या मासिकात १९६२ साली आलेला हा लेख- लोकलगाडीचा रोजचा प्रवास म्हणजे एक साहसच. त्यांत शांत माणसाचीही गडबड न उडणे मुष्किलच. पाकिट, पैसे आणि जीव संभाळून सुखरूप घरी परतले की, आजची कामगिरी पार पडल्याचं समाधान वाटतं '. विरार किंवा बोरिवली लोकल किंवा फास्ट आगगाड्यांतून, विशेषतः सकाळी नऊ ते दहा आणि संध्याकाळी साडेपांच ते साडेसहा ह्या दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो लोकांपैकी तुम्ही एक आहांत का? मग कितीतरी अनुभव तुमच्या गांठी असतील. माझ्या रोजच्या अनुभवांत मूळच्या धांदरट स्वभावामुळे विशेषच भर पडली आहे. म्युझिकल चेअर व राँग नंबर गाडीत रोजचीच गर्दीच विलक्षण. ऑफिसच्या वेळी धांवत पळत प्लॅटफॉर्मवर यायचं आणि गर्दीतून अचूक दरवाजा पकडून शक्यतो आधी गाडीत प्रवेश मिळवला, तरी पुन्हा बसायला जागा पकडण्यासाठी ह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , अनुराधा

प्रतिक्रिया

 1. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  अनुभव चांगला

 2. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  छान , अनुभव

 3. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  घेतलेल्या अनुभवांची उजळणी वाचताना झाली ?

 4. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  पक्का खरा अनुभव. छान छान आहे.

 5. shripad

    2 वर्षांपूर्वी

  छान लेख!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen