धुम्रपानाविरुद्धची माझी ‘मैत्रीपूर्ण’ लढाई (ऑडीओसह )

पूर्वप्रसिद्धी अंक : किर्लोस्कर, फेब्रुवारी १९७९

लेखाबद्दल थोडेसे: शंतनुराव किर्लोस्कर  ( २८ मे १९०३- – २४ एप्रिल १९९४) हे एक दिशादर्शक यशस्वी उद्योगपती आणि साहित्यप्रेमी व्यक्ती म्हणून आपल्याला माहिती आहेत. देशाला लष्करीदृष्ट्या सज्ज राहणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच आर्थिकदृष्ट्या मजबूत असणेही महत्वाचे आहे असा विचार त्यांनी आग्रहाने मांडला होता, त्या दिशेने त्यांनी स्वतः खूप प्रयत्नही केले. अमेरिकेत एमआयटीचे पदवीधर होणाऱ्या अगदी सुरुवातीच्या भारतीय व्यक्तींमध्ये ते होते. तिथे शिक्षण घेत असताना त्यांचे बहुतांश मित्र धुम्रपान करणारे होते.  धुम्रपानाबद्दल तीव्र घृणा असताना आपल्या  या ‘धुम्रप्रेमी’ मित्रांसोबत झालेल्या मैत्रीपूर्ण झटापटींचे त्यांनी सांगितलेले हे किस्से आहेत. किर्लोस्कर मासिकात फेब्रुवारी १९७९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

********

अमेरिकेत एम्.आय्.टी.त शिकत असताना मी विद्यार्थी-वसतिगृहात राहात असे. वसतिगृहातल्या सर्व विद्यार्थ्यांत मी एकटाच भारतीय होतो आणि वयाने सर्वांत लहान होतो. माझे त्या वेळचे निकटचे मित्र हॅरी कथवर्स्टन, बॉब हवस्टीनर, ब्लॅक आणि कीलिश हे सारे गोरे अमेरिकन होते. हॅरी आणि ब्लॅक हे वयाने माझ्यापेक्षा बरेच मोठे होते. आमचा चौघांचा गट होता. आमच्या गटातला प्रत्येक जण अभ्यासात हुशार होता. मित्र म्हणून आम्ही सारे एकमेकांवर प्रेम करीत असू. मी परदेशचा आणि वयाने लहान याची जाणीव ठेवून, माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझे अमेरिकन मित्र त्यांच्या लहान भावासारखा मानून मला जपत असत.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 14 Comments

 1. rajandaga

  सुन्दर

 2. rajandaga

  छा न लेख

  शिवाय किर्लोस्कर कमिंस चि जन्म कहानी

 3. ashish.munishwar29@gmail.com

  Khupch chan 👌👌

 4. jsudhakar0907

  अगदी ओघवती लेखनशैली !

  खूप छान !!

Leave a Reply