चाळ....शंभर वर्षांपूर्वी

पुनश्च    अज्ञात    2020-10-14 06:00:48   

अंक : उद्यान, फेब्रुवारी १९१९

लेखाबद्दल थोडेसे : आजचा लेख फेब्रुवारी १९१९ साली उद्यान मासिकात प्रसिद्ध झाला होता.  शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला लेख आपण वाचतो आहोत, या कल्पनेनेच आधी अंगावर रोमांच उभे राहतात आणि हा लेख आपण जसजसे वाचत जातो तसे तो खरोखरच शब्दांमधून काळाची सफर घडवून आणतो. चाळ नावाची वस्ती आता मुंबई पुण्यात केवळ नावालाच राहिली आहे आणि तिची जागा  'सोसायटी' या शब्दाने घेतली आहे.  शंभर वर्षांपूर्वी 'चाळ' ही कल्पना नुकतीच आली होती आणि या 'खुराड्यां'विषयी अनेकांना कुतुहल होते. टिचभर जागेत राहणाऱ्यांची  अनेकांना कीव येत असे, टिंगल टवाळीही होत असे आणि त्याचवेळी चाळींनी सामुदायिक जगण्याची जी नवी संस्कृती जन्माला घातली तिच्याबद्दल उत्सुकताही असे. आपले खरे नाव काळाच्या उदरात तसेच ठेवून 'चाळ प्रिय' असे टोपण नाव धारण करुन कोणी तरी हा लेख लिहिलेला आहे. लिहिणारी व्यक्ती नामवंत होती की हौशी  ते कळण्याचा काही मार्ग नाही, परंतु लिखाणाची शैली मात्र सराईत लेखकाची आहे. आपल्या वाचकांत कोणी माहितगार असेल तर या चुरचुरीत, रंजक आणि टोमणे मारण्यात पटाईत अशा या अज्ञात लेखकावर प्रकाश टाकतीलही.*********

चाळ हा शब्द दिसण्यांत अगदी लहान, दोनच अक्षरांचा, आणि उच्चारावयाला अगदी सोपा, असा जरी असला तरी या दोन अक्षरी शब्दांत काय गूढ आहे, याचा यथार्मात विचार करण्याचं योजिले आहे. एखादी वस्तू अगदी साधी असली, किंवा पुष्कळ परिचयाने साधीशी वाटली तरी देखील किंचित् चिकित्सक दृष्टीने पाहू लागलो असतां तीत काय गूढ भरले आहे याची आपणाला ज्याप्रमाणे बरोबर कल्पना होते आणि मग आपल्याला ती गोष्ट कांही तरी विशेष आहे असे वाटू लागते तद्वतच सांप्रत “चाळ” या शब ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


निबंध , उद्यान

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.