मैं पता लगाता हूँ!

गोरखपूर आणि फूलपूर पोटनिवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आणि योगी आदित्यनाथांच्या पायाखालची वाळू सरकली. कुठल्याही क्षणी आपल्याला निरोप येईल आणि दिल्लीला बोलावून घेतलं जाईल अशी भिती त्यांना वाटू लागली. फोनच्या रिंगटोनचा आवाज आला की ते घाबरून उठून उभेच राहायचे. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यावर बराच काळ कधी भाजप पुढे तर कधी सपा-बसपाची युती पुढे, असं चित्र होतं तेव्हा योगी निर्धास्त होते. थोड्या वेळातच भाजप मुसंडी मारेल याची त्यांना खात्री होती. रोजचा फलाहार घेतानाही ते निश्चिंत होते आणि एकदा विजय जाहीर झाला की काय बोलायचे याची सहाय्यकासमोर उजळणी करत होते. ‘ये विजय हम मोदीजी और उनके नेतृत्वको समर्पित करते है. ये जीत सामान्य कार्यकर्ताकी जीत है.’ ठिक आहे ना? त्यांनी आपल्या सहाय्यकाला विचारलं.

हा सहाय्यकही एकेकाळी त्यांच्यासोबतच गोरखनाथ मठात होता. योगींनी मुख्यमंत्री झाल्यावर त्याला खास बोलावून घेतलेलं होतं. सहाय्यक नम्रपणे हसला आणि म्हणाला, ‘योगीजी थोडा नवनीत कम पड रहा है इसमे. कार्यकर्ता वगैरा तो ठिक है, पर नवनीत चढा दिजीये और थोडासा. चार चम्मच और डाल दिजीये, क्या कमी है अपने पास?, ’ योगी हसले. ‘हमारी राजनीतीके पहिये नवनीतके बिना तो हिलतेही नही है भैया’ असं म्हणत त्यांनी आपलं आधीचं वाक्य थोडं सुधारलं आणि पुन्हा उच्चारलं.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply