fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

आधुनिक महाराष्ट्राचे आद्याचार्य व राष्ट्रगुरु (पूर्वार्ध)

बाळशास्त्री जांभेकरांचे नाव घेतल्यावर अनेकांना त्यांनी १८३२ साली सुरू केलेले ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र आठवते आणि तेवढ्यावरच जांभेकरांचे कार्य संपते. प्रत्यक्षात जांभेकर हे अद्भूत आणि अफाट व्यक्तिमत्व होते. दर्पण हे इंग्रजी-मराठी वृत्तपत्र सुरु केले तेव्हा ते केवळ  २० वर्षांचे होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी, बंगाली, गुजराती एवढ्या भाषांचे तसेच भूगोल, गणित अशा विषय़ांचे अव्वल दर्जाचे आकलन होते.  त्यांचे चरित्र प्रसिद्ध झाल्यावर त्याचे समीक्षण करण्याच्या निमित्ताने काहींनी जांभेकरांवरच टीका केली तेव्हा उद्विग्न होऊन १९५३  साली  ‘चित्रमयजगत्’ मध्ये आलेल्या या लेखामधून दिसणारे जांभेकर पाहिले तर आपण थक्क होतो. एकाच आयुष्यात एवढे काही करणे कसे शक्य आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो-

यावेळी हा दीर्घ लेख आपण जाणीवपूर्वक दोन भागात प्रसिद्ध करतोय. जेणेकरून वाचनाचा उत्साह टिकून रहावा, आणि दर्पणकारांबद्दलची ही मोलाची माहिती डोक्यात नोंदवली जाण्यास पुरेसा अवसर मिळावा.

********

अंक- चित्रमयजगत्;  वर्ष- नोव्हेंबर १९५३

‘आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे जीवनवृत्त व लेखसंग्रह’ प्रसिद्ध होऊन दोनअडीच वर्षे झाली. हा त्रिखंडात्मक अपूर्व ग्रंथ प्रसिद्ध करून ‘लोकशिक्षण-’ कार श्री. गणेश गंगाधर जांभेकर यांनी मराठी चरित्रवाङ्‌मयात मौलिक महत्त्वाची भर घातली, आणि त्याबरोबरच पश्चिम हिंदुस्थानातील इंग्रजी सत्तेच्या आरंभकाली उदय पावलेल्या एका असामान्य बुद्धीच्या व कर्तृत्वाच्या महाराष्ट्रीय विभूतीचे यथातथ्य दर्शन महाराष्ट्राला घडविले. साहजिकच या ग्रंथाचे अनेकांकडून कौतुकास्पद स्वागत झाले. पण एक-दोन वृत्तपत्रांतून त्यावर अधिकांत अधिक कडक बेजबाबदार टीकाही झाली. विशेष वाईट वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, ह्या वावदूकपणात ग्रंथ व ग्रंथकार यांच्यासमवेत ग्रंथविषय कै. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे सुद्धा अधिक्षेपाच्या तडाख्यात सापडले! ग्रंथकारांनी वर्णिल्या प्रकारचे ते नवयुगप्रवर्तक पुरुष नाहीत, असे सिद्ध करण्याच्या भरात बाळशास्त्री हे इंग्रज राज्यकर्त्यांच्या आज्ञेनुसार निरनिराळ्या विषयांवर शाळकरी पोरांकरिता चार सामान्य क्रमिक पुस्तके लिहिणारे केवळ तात्या पंतोजी होते, असेही म्हणण्याचा विक्रम एखाद्या छद्मी टीकाकाराने केला!

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 9 Comments

 1. वा,बुध्दिमान जांभेकरांचीआओळख झाली

 2. अप्रतीम लेख . लेखन काळ कोणता ते कळले नाही .
  जांभेकरांवरील नकारात्मक टीका ही त्यांचे इंग्रज अधिकाऱ्यांशी असलेल्या जवळीकीमुळे केलेली असावी असा अंदाज आहे . एखादया व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्यात इतर हितसंबंध घुसडणे ही गोष्ट आधुनिक नसून खूप जुनी आहे ह्याची खात्री पटली व गंमत वाटली

 3. उत्तम उपक्रम !
  पण या क्षेत्रात मी निरक्षर असल्याने लॉगिन अजून जमत नाही.

  1. सर माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही. असता तर मी तुम्हाला फोन केला असता. कृपया मला फोन करा. नंबर 9152255235 हा आहे.

 4. अतिशय दुर्मिळ व महत्वपूर्ण माहिती मिळाली. अशा अनेक दिग्गज विद्वान लोकांना टिकेचे धनी व्हावे लागले आणी त्यांचा मोठेपणा तेव्हा आणि आजही सर्वमान्य झाला नाही हे आपले दुर्दैव .लेख खूपच माहितीपूर्ण आणि छान.

 5. Balshastryanvishyichi atishay durmil v titikich udbodhak mahiti upalabdh karun dilyabaddal dhanyavad.
  Uttam lekh.

 6. लेख खूपच माहितीपूर्ण आणि वाचनीय झाला आहे.इतक्या वेगवेगळ्या विषयांत नैपुण्य मिळवून प्रभावी अध्यापन करणे,अध्यापक तयार करणे ही अचाट कामे एकात व्यक्तीने करून त्याला मान्यता पण मिळणे हे फारच अपूर्वाईचे आहे.

 7. धन्यवाद. आद्द्यगुरु जांभेकरशास्त्रींबद्दल अनेक तपशील नव्याने कळले. त्याचबरोबर. क्षुद्रमनोवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्यावर केलेली टीका वाचताना ”ऐसा तो गुण कोणता, खलजनी नाहीच जो निंदिला” याचा प्रत्यय आला. अध्यापक शिक्षणाचा शास्त्रीबोवांशी असलेला संबंध वाचून विशेष आनंद झाला. त्याचबरोबर एका विचाराने विषण्णता आली. आभाळाएवढे कर्तृत्व असणारी त्या काळातली अनेक माणसे अल्पायुषी असल्याचे जाणवते आणि मन खिन्न होते.

 8. बाळशास्त्री जांभेकरांबद्दल थोडीशी माहिती होती, पण या लेखामुळे त्यात चांगलीच भर पडली.

Leave a Reply

Close Menu