तिसरा पर्याय

पुनश्च    डॉ. यश वेलणकर    2018-07-23 06:00:37   

लेखक: डॉ यश वेलणकर

अतुलचा स्वभाव शांत आहे असे सर्वजण म्हणतात. राग आला की तो लगेच राग व्यक्त करीत नाही, शांत राहतो. पण हा शांतपणा वरवरचा असतो मनातल्या मनात तो अस्वस्थ असतो,घुसमटत असतो,धुमसत असतो.अतुल सतत आजारीही  असतो. तोंडात फोड येणे,पित्त होणे,डोके दुखणे असे काहीना काही नेहमीच होत असते. अखेरीस एका डॉक्टरनी त्याच्या आजारांचे कारण त्याच्या स्वभावात आहे असे निदान केले.अतुलला मात्र हे मान्य होत नव्हते. रागीट माणसाला पित्ताचा त्रास होऊ शकतो पण माझ्या सारख्या शांत माणसाला असा त्रास का व्हावा हा त्याचा प्रश्न असायचा. शेवटी त्याला कुणीतरी माईंडफुलनेस विषयी सांगितले. ते शिकून घेऊन तो सराव करू लागला आणि त्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागला. आता त्याला अनेक जण विचारतात की माईंडफुलनेसमुळे नक्की काय झाले ?

माणसाचे मन तीन प्रकारे काम करते असे मानसशास्त्रज्ञ म्हणतात. संगणकाचे जसे वेगवेगळे मोड असतात तसे आपल्या मनाचे तीन मोड असतात.याला मल्टीमोडल थिअरी ऑफ माईंड या नावाने ओळखले जाते. आपण एक उदाहरण घेऊन हे तीन मोड समजून घेऊया.सैराट वागणे,भावना दाबून ठेवणे आणि साक्षीभावाने भावनांकडे पाहणे असे हे तीन प्रकार आहेत.त्यातील पहिला प्रकार असा असतो की माझ्या मनात एखादा विचार किंवा भावना येते आणि मी लगेच कृती करतो.रस्त्याच्या एका बाजूला मी उभा आहे  आणि पलीकडे जावे असा विचार माझ्या मनात येतो आणि मी लगेच रस्ता ओलांडू लागतो.शाळेतील लहान मुले असेच वागतात म्हणून शाळेजवळच्या रस्त्यावर वाहने हळू चालावा अशी सूचना असते.माणूस रागाच्या भरात एखादी कृती करतो त्यावेळी त्याचे मन याच मोड मध्ये असते.याला इम्पल्सीव किंवा सैराट वागणे म्हणता येईल.या मोड मध्ये मनातील भावनांची जाणीवच नसते म्हणजे   आत्मभान नसते. आपले ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.