निद्रा आणि स्वप्ने

अलका काकूंना निद्रानाश आहे. अंथरुणावर पडून त्या तासनतास झोपेची आराधना करीत राहतात पण निद्रादेवी प्रसन्न होत नाही. झोपेच्या गोळ्यांची सवय लागते म्हणून त्या गोळी घेण्याचेही टाळतात. रात्री झोप लागत नाही, त्यामुळे सकाळी ताजेतवाने वाटत नाही, दिवसभर जांभया येत राहतात. हा निद्रानाश कशाने कमी होईल असा प्रश्न त्यांना पडला आहे.

संदीपला झोपेत बोलण्याची सवय आहे, काहीवेळा तो झोपेत हातवारेदेखील करतो. त्याचे झोपेतील वर्तन इतरांच्या चेष्टेचा विषय आहे. तो झोपेत काय करतो ते त्याला जागे झाल्यानंतर आठवत नाही. झोपेत माणसे का बोलतात या प्रश्नाचे उत्तर तो शोधतो आहे.

निशा  एके दिवशी सकाळी जागी झाली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला कोणतीच हालचाल करता येईना. कुशीवर देखील वळता येईना. ती खूप घाबरली आणि हाका मारण्याचा प्रयत्न करू लागली. पण तोंडातून आवाजही फुटेना. शेवटी ती तशीच पडून राहिली आणि पाच मिनिटांनी तिला हालचाल करता येऊ लागली. नंतर ती रोजच्यासारखी उठून चालू लागली. पाच मिनिटापूर्वी आपल्याला नक्की काय झाले होते हेच तिला समजेनासे झाले आहे.  

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 12 Comments

 1. purnanand

  लेख खूपच छान. या डॉक्टरांचे ‘ ध्यान विज्ञान ‘ या विषयावरील एक छान पुस्तक आहे. ध्यानाच्या जगभरातील पद्धती,
  त्या अवलंबिल्या असता त्यांचे शरीरावर होणारे अल्पकालीन /दीर्घकालीन परिणाम, अमेरिकेसारख्या देशातही
  यावर वैज्ञानिक पातळीवर झालेले संशोधन , तेथील शाळामधूनही चालू झालेले योगासनाचे वर्ग ,तेथील राज्यकर्त्या लोकांचा
  सक्रीय पाठींबा यावर खूप छान माहिती वेगळ्या दृष्टीने अतिशय सुंदर शब्दांकनात दिली आहे. कृपया त्या पुस्तकाचा गोषवारा एखाद्या
  लेखाद्वारे देल्यास पुनश्च च्या वाचकांना ,जगभरातील इतर देशांना पटलेले योगाचे महत्व लक्षात आणून देता येईल.

Leave a Reply