आयुषमानची "ड्रिमगर्ल"


सिनेमाची कथा आणि पटकथा फसलेली असली तरी विनोदनिर्मिती आणि कलाकारांचं अचूक टायमिंग यावर सिनेमा तरून जातो व मासेसचं मनोरंजन करण्यात यशस्वी होतो. आयुष्यमान खुराणा पुन्हा एकदा आपल्या विनोदाची जाण उत्स्फूर्त अभिनयाने खिळवून ठेवतो.  

ड्रिमगर्ल 

  निषिद्ध समजले गेलेले विषय असलेल्या पटकथा निवडून त्यात आपलं उत्तम योगदान देऊन चांगले चित्रपट करणे यात आयुष्यमान खुराणा तरबेज आहे. दिग्दर्शक राज  शांडिल्यच्या ड्रीमगर्ल या सिनेमातही त्याने हा प्रयत्न केला आहे. पण या सिनेमावर त्याच्याच विकी डोनर या सिनेमाची छाप स्पष्टपणे जाणवते. तांत्रिकदृष्ट्या काहीसा फसलेला हा सिनेमा स्वतःच्या खांद्यावर तो वाहून नेतो. यात अन्नू कपूर, विजय राज मनज्योत सिंह आणि इतर काही कलाकार त्याला मदत करतात. लहानपणी इच्छा नसताना रामलीलामध्ये सीतेची भूमिका करावी लागलेला आणि त्यामुळे स्त्रियांच्या आवाजात बोलण्याची कला अवगत केलेला करमवीर सिंह विसाव्या वर्षापर्यंत सीता आणि राधेची भूमिका करत राहतो. आता मोठं झाल्यावर वडिलांवर असलेलं कर्ज फेडण्यासाठी नोकरीच्या शोधात असलेला करम एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवतो. तिथे त्याला पूजा नावाच्या मुलीच्या आवाजात ग्राहकांशी बोलावं लागत असतं. लोक तासनतास त्याला मुलगी समजून त्याच्याशी बोलत असतात आणि त्याच्या प्रेमात पडतात. यातून अनेक गोंधळ निर्माण होतात आणि गुंता वाढत जातो. सिनेमाची कथा आणि पटकथा फसलेली असली तरी विनोदनिर्मिती आणि कलाकारांचं अचूक टाय ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. Anil Kulkarni

      5 वर्षांपूर्वी

    सिनेमा एका उंचीवर नेण्यास दिग्दर्शक कमी पडले आहेत. ड्रीम ही नाही आणि गर्ल ही नाही. रांगडी ड्रीम गर्ल सहन करावी लागते.सुमार चित्रपटाला कधीकधी प्रसारमाध्यमांच्या कुबड्या तारून नेतात, त्याचेच हे उदाहरण. डॉ अनिल कुलकर्णी पुणे 940 380 51 53.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen