कॅप्टन मार्व्हल : मार्व्हलचा हुकमी एक्का


सिनेमॅजिकमध्ये दर रविवारी वाचता येईल  इंग्रजी, हिंदी, मराठीतील काही महत्वाच्या चित्रपटांची आटोपशीर परंतु टोकदार समीक्षा. प्रदर्शित झालेल्या ताज्या चित्रपटांकडे पाहण्याची एक थेट आणि चिकित्सक नजर -

आजच्या सदरात विवेक कुलकर्णी यांनी केलेली कॅप्टन मार्व्हल ची समीक्षा

कॅप्टन मार्व्हल : मार्व्हलचा हुकमी एक्का -  विवेक कुलकर्णी एकविसावा मार्व्हल मुव्ही म्हणून याची उत्सुकता प्रचंड वाढली, जेव्हा ‘अँव्हेन्जर्स : इन्फिनिटी वॉर’ मध्ये पहिल्यांदा शील्ड एजंट निक फ्युरी कॅप्टन मार्व्हलला पेजरवरनं मदतीसाठी संदेश पाठवला. कोण आहे कॅप्टन मार्व्हल? त्यालाच का फ्युरी संदेश पाठवतो? त्या कॅप्टनमध्ये असं काय आहे की इतर सुपरहिरोजमध्ये नाही. कॅप्टन मार्व्हल हा पुरूष नसून एक स्त्री आहे हे सिनेमा प्रदर्शित होण्याआधी माहित झालं. आतापर्यंत मार्व्हलचे बहुतेक सर्व पुरूष सुपरहिरो बघायची सवय लागल्यामुळे तसंच यांच्याकडे यच्चयावत सर्व सुपरपावर्स असताना अजून हिच्याकडे काय असणारे असाही प्रश्न पडला होता. निक फ्युरी इतरांना सोडून हिलाच संदेश पाठवतो म्हटल्यावर तर उत्सुकता शिगेला पोचली होती. या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे हा सिनेमा. ९५ साली क्री ग्रहावर स्टारफोर्सची सदस्य वीअर्स (ब्री लार्सन) ही तिचे गुरु यॉन-रोग (ज्यूड लॉ) यांच्याकडून प्रशिक्षण घेतेय. प्रशिक्षणा दरम्यान तिला स्वप्नात काहीतरी दिसत असतं. तिला वाटत असतं त्या आठवणी आहेत. या आठवणी तिला अस्वस्थ करत असतात. तिचं ग्रहावरल्या परमशक्तीशी बोलणं होतंय पण त्याचं प्रयोजन तिला माहित नाही. स्क्रल्स हे क्षणात रुप पालटणारे परग्रहवासी क्री ग्रहाचे शत्रू आहेत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. akashvthele

      6 वर्षांपूर्वी

    आयर्न मॅन, थॉर यांच्यापेक्षा शक्तिशाली ती असं दाखवलं जाणार आहे, हे ऐकण्यात येतंय पण त्यामुळे उगाच चांगली सिरीज निरास होईल. एका महिलेला शक्तिशाली दाखवून मार्व्हल SJW किंवा पोलिटिकली करेक्ट व्हायचा प्रयत्न करतंय की काय असं वाटतंय!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen