रुपवाणी

रुपवाणी
सिनेमा, फिल्म, मूव्ही, चित्रपट या शब्दांसाठी रवीन्द्रनाथ टागोरांनी एक अस्सल भारतीय शब्द वापरला-रूपवाणी-किती नेमका आणि अन्वयार्थक शब्द! रूप या शब्दातून या माध्यमाची दृश्यात्मकता तर वाणी या शब्दातून त्याचे ध्वनिरूप सूचित होते. त्यातूनच या चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिकाचे नामाभिधान झाले-वास्तव रूपवाणी.
वास्तव रूपवाणी हे ‘प्रभात चित्र मंडळा’चे चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिक गेली २५ वर्षे सातत्याने चालू आहे. चित्रपट संस्कृती खऱ्या अर्थाने रुजायची असेल, तर स्थानिक भाषांतून व्यवहार झाला पाहिजे, हे लक्षात घेऊन सुधीर नांदगावकर यांनी ‘वास्तव रूपवाणी’या मासिकाची १९९४ मध्ये सुरुवात केली. अमोल पालेकर, अरुण खोपकर, श्यामला वनारसे, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, अशोक राणे, सुधीर नांदगांवकर, विजय पाडळकर, अनिल झणकर, रेखा देशपांडे ते थेट श्रीकांत बोजेवार, सुषमा दातार, गणेश मतकरी, अभिजित रणदिवे, संतोष पाठारे, अभिजित देशपांडे आदी अनेक जाणकारांनी ‘रूपवाणी’तून सातत्याने चित्रपटविषयक महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.

सध्या सर्व विद्यापीठांतून माध्यमविषयक अभ्यासक्रम व त्याचा भाग म्हणून चित्रपटविषयक अभ्यासक्रम शिकवले जाऊ लागले आहेत. लवकरच चित्रपटविषयक स्वतंत्र विभाग व विद्यापीठेही अस्तित्वात येतील, तशा हालचालीही सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर, ‘वास्तव रूपवाणी’ सारख्या अभ्यासपूर्ण चित्रपटविषयक नियतकालिकाची विशेष आवश्यकता आहे. चित्रपटकलेचा जाणता रसिक व अभ्यासक घडवण्याचे काम ‘वास्तव रूपवाणी’ने सुरू ठेवले आहे. काळानुरूप या अंकाचे स्वरूप बदलते आहे एवढेच. बहुविध डॉट कॉमवर ‘रुपवाणी’च्या अंकातील लेखांसोबतच इतरही चित्रपटविषक काही मजकूर, चित्रफिती, माहिती दिली जाणार आहे.

रुपवाणी नियतकालिकातील लेखसंग्रह..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..