जडण-घडण

जडण घडण मासिक

विद्यार्थी, शिक्षक, पालक

सुसूत्रता आणि सुसंवाद निर्माण करणारी एक शृंखला

शिक्षक, पालक या नात्यानं मुलांचे शिक्षण, त्यांचा सर्वांगीण विकास, त्यांचं करिअर हे विषय आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे असतात. झपाट्याने बदलत चाललेली आजूबाजूची परिस्थिती कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला नक्कीच गंभीरपणे विचार करायला लावते की शिक्षणातून नेमकं आपण काय देतो ? आणि मुलं काय शिकतात? ती कशी घडत जातात? ही प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी कशी करता येईल? शिवाय -

बदलती शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम पटनोंदणीचा प्रश्न शिक्षणाचे माध्यम गुणांची स्पर्धा आणि करिअरचा प्रश्न नवेनवे शैक्षणिक प्रयोग करणारे शिक्षक आणि शाळा आवर्जून वाचावीत अशा पुस्तकांचा परिचय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी.. स्वावलंबी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं ? शिक्षक, पालक म्हणून या सगळ्या वाटचालीत आपली भूमिका काय ? आपण काय करू शकतो ? मुलांबरोबरच आपणही कसे घडत असतो....... अशा अनेक प्रश्नांची मुळातून उत्तरं शोधण्यासाठी गेली १६ वर्षे 'जडण घडण' मासिकाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

आनंददायी शिक्षणाचे असे नवनवीन मार्ग माहिती होण्यासाठी शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्या जडणघडणीचा वेध घेणारं, त्यांचा साथीदार बनलेलं. अनेक मान्यवरांचे विचार देणारं एक आगळं-वेगळं मासिक...

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

जडण-घडण

नदी वाहू दे...

ऋजुता खरे | 20 Aug 2021

उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंगा आणि यमुना या नद्यांना ‘व्यक्ती’ म्हणून मान्यता देऊन त्यांच्या अधिकारांचं रक्षण व्हावं असं मत नोंदवलं होतं. नद्यांना मुक्तपणे वाहता यावं, त्यात मानवी हस्तक्षेप होऊ नये.

तासुकु होंजो

प्रा. माधुरी शानभाग | 16 Aug 2021

तासुकु होंजो हे एका पिढ्यान्पिढ्या धार्मिक कर्मकांडे करणार्‍या एका प्रसिध्द, खानदानी कुटुंबात जन्मलेले होते. जपानमध्ये या कुटुंबांना जनमानसात खास स्थान असतं.

पालकांना विनंतीपत्र

यशवंत तुकाराम सुरोशे | 14 Aug 2021

मुलांच्या सहवासाची, त्यांच्या बागडण्याची, त्यांच्या प्रश्नांची नि उत्तरांची, त्यांच्या उच्छादाची, त्यांच्या असण्याची, त्यांच्या निरागस नजरेची, अपार प्रेमाची इतकी सवय झाली आहे की, कोरोनाचा खूप राग येतोय. ती तुमची मुलं असली तरी आमची कर्तृत्वाची झाडे आहेत. सुजाण

शिक्षणाची उद्यानं फुलवणारे ‘माळी’ सर

डॉ. सागर देशपांडे | 02 Aug 2021

अत्यंत प्रतिकूल काळात डॉ. मारुतराव गोविंदराव माळी तथा डॉ. मा. गो. माळी हे नाव धारण करणार्‍या एका ध्येयवादी शिक्षकानं दिलेलं योगदान विलक्षण आहे

बदलते जग- बदलते शिक्षण

विवेक सावंत | 29 Jul 2021

गो फ्रॉम ब्ल्यू कॉलर जॉब्ज- रेड कॉलर जॉब्ज टू ग्रीन कॉलर जॉब्ज. म्हणजे काय? तर या प्रगत देशांमधले ४ टक्के रोजगार हे पृथ्वी दुरुस्त करण्यासाठीचे आहेत.

दूरस्थ कलाशिक्षण

शीतल कापशीकर | 29 Jun 2021

आपली शिक्षणपद्धती बदलू पहात आहे. त्याचीच ही नांदी समजूया. निव्वळ परीक्षार्थी - गुणार्थी होण्यापेक्षा विद्यार्थी ज्ञानार्थी कसे घडतील हे पाहूया.

सावधान ! नाळ तुटते आहे

डॉ. श्याम जोशी | 28 Jun 2021

परीक्षा विहित पद्धतीने घेणं व देणं याला पर्याय असूच शकत नाही. विद्यार्थी व पालकांनी, त्यांच्याच हितासाठी, त्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. मात्र आत्यंतिक दुर्दैवाने, सद्य परिस्थिती या विपरीत आहे हे आपण पाहतो आहोत

सूर्यरक्ताची राजनीती

‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत | 24 Jun 2021

शिवाजी महाराज हे पितृशाखेकडून सूर्यवंशाचे वारस होते. त्यांच्या अंगी सळसळते ‘सूर्यरक्त’ नांदत होते. या ‘सूर्यरक्ताच्या’ वारसदारांच्या हयातीत असंख्य मति गुंग करणारे प्रसंग गुदरून गेले. या प्रत्येक प्रसंगी महाराजांची एक विशिष्ट राजनीती व रणनीती प्रकट झाली आहे. ती राजनीती समजून घेणे हे अत्यंत बिकट काम आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’

संकलन | 19 Jun 2021

मराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.
Install on your iPad : tap and then add to homescreen