निवडक प्रतिक्रिया

 1. पुनश्च - शिवाजीमहाराजांचे कार्य-कौशल्य

   

  अुपयुक्त अितिहास. -- Mahesh Pokharanakar
 2. ललित - ऑर्वेल आणि गोलान्झ

   

  खूप छान लेख वाचतोय, बहुविध चं सभासदत्व घेतल्याचा निर्णय घेतला ते योग्यच झाल, असं येथील लेख वाचताना वाटलं -- Shrikant Pawar
 3. पुनश्च - एक तत्त्वज्ञानी कुबेर

   

  खूपच प्रोत्साहित करणारे लिखाण केले आहे -- Hemant Marathe
 4. पुनश्च - कारखान्यांतून संशोधन करताना

   

  अत्यंत माहितीपूर्ण लेख. -- Asmita Phadke
 5. वयम् - सोशल मीडिया की पर्सनल मीडिया? (पूर्वार्ध)

   

  सुरेख लेख. पूर्णपणे सहमत. -- Asmita Phadke
 6. पुनश्च - खानोलकरचे देणे - भाग १

   

  योग्य वेळी हा लेख वाचायला मिळाला। एखाद्या प्रतिभावान व्यक्तीची प्रतिमा मनात ठसते ती त्याच्या साहित्यकृतीमुळे आणि अंगभूत चांगुलपणामुळे। तिला धक्का लावणारे किस्से वाचनात आले की मन खंतावते। नको होते ते हाती पडायला, असे काहीसे वाटते। त्यावर उतारा म्हणजे हा लेख! -त्या साहित्यिकाचे प्रांजळ शब्दचित्र उमदेपणाने पुन्हा मनात रुजवणारे!! -शुभदा चौकर -- शुभदा चौकर
 7. वयम् - मधुमनाची माणसं

   

  अप्रतिम! अंतर्मुख करायला लावणारं लेखन -- Prashant Chaudhari
 8. रुपवाणी - चित्रस्मृती

   

  खुप-छान-माहिती ! "बाॕबी" चित्रपटासाठी "शंकर-जयकिशन" हे संगीतकार म्हणून नक्की होते. मग त्याऐवजी "एल-पी " कसे आले ? ह्यावरसुध्दा एकदा निवांतपणे तपशिलवार , संगतवार लिहावे. -- श्रीनिवास-लखपती-पनवेल. -- Shriniwas Lakhpati
 9. पुनश्च - उत्साहवर्धक वाङ्मय

   

  आज, कमाल गेल्या वीस वर्षांतल्या पुस्तकांचा विचार केला तर कोणती पुस्तकं सुचुव शकाल? लगेचच दोन नक्कीच समोर येतात: विश्वास नांगरे पाटील , २०१६. मन में है विश्वास. राजहंस, पुणे. २५०/- आणि शशिकांत पित्रे, (मेजर जनरल (निवृत्त)) , २०००. या सम हा : अजिंक्य बाजीरावाच्या युद्धनेतृत्वाची लोकविलक्षण यशोगाथा!, vol.२०००. राजहंस, पुणे. २०२० ४००/- -- Milind Kolatkar
 10. पुनश्च - उत्साहवर्धक वाङ्मय

   

  कोणत्याही कालखंडात हा लेख उपयुक्त आहे -- Hemant Marathe
 11. पुनश्च - खानोलकरचे देणे - भाग २

   

  पु ल देशपांडे यांनी खानोलकरांविषयी लिहिलेले दोन्ही लेख वाचले .यापूर्वी हृदयनाथ मंगेशकरांचा खानोलकरां विषयीचा लेख देखील वाचला . लोकसत्तामधील सुभाष अवचट यांनी लिहिलेला लेखही वाचला . त्यानंतर खानोलकरांच्या कन्येने लिहिलेली पोस्ट देखील वाचण्यात आली . हे सगळं वाचल्या नंतर मनाला हुरहूर वाटून जाते कि एक चांगला प्रतिभासंपन्न कवी लेखक त्यांच्या समकालीन कलावंतांना जाणून घेता आला नाही . खानोलकरांना समजून घ्यायला थोडा उशीरच केला असावा . एवढा प्रतिभासंपन्न कवी ऐहिक जीवनातील समस्या प्रश्न यांनी गांजून जायला नको होता .याबाबत इतरांनी त्यांना आधार दिला असता तर मराठी साहित्य मध्ये मोलाची भर पडली असती . असो . त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत कोंडुरा अगोचर गणूराया आणि चानी . चानी कादंबरी वाचल्यानंतर मी खूप वेळ रडत होतो त्याचं स्पष्टीकरण मला देता येणार नाही .त्यांच्या काही कविता खूप आवडीचा आहेत . त्यांच्या गाण्यांना हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या चाली आजही ऐकावेसे वाटतात . आपण खूप छान लेख उपलब्ध करून दिले धन्यवाद . -- atmaram jagdale
 12. पुनश्च - छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास

   

  सुंदर . . . वाचनीय . . . आवडलंय . . . धन्यवाद -- Diwakar Ganjare
 13. पुनश्च - छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास

   

  खूप सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद -- Hemant Marathe
 14. पुनश्च - कथा :किल्ला

   

  आशयघन, अंतर्मुख करणारी कथा! -- Kiran Joshi
 15. पुनश्च - घटका गेली पळें गेलीं

   

  मस्त लिहिलय -- JAYANT PRABHUNE
 16. वयम् - नववर्ष स्वागताच्या तऱ्हा

   

  लेख छानच आहे. नवी माहिती मिळाली. धन्यवाद ! --
 17. मराठी प्रथम - शब्दांच्या पाऊलखुणा - पेवात पडणे (भाग - २०)

   

  तीसेक वर्षांपूर्वी मी पेव बघीतले होते. दोन भिंतीच्या आत धान्य साठविण्यासाठी दोन पत्राची जागा केली जात होती..त्यात आठ दहा खंडी धान्य साठवता येत असे.. काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पेव राहण्यासाठीची घरं बनलीयं.. छान माहिती मिळाली... -- Gajanan Jadhav
 18. मराठी प्रथम - संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर

   

  मराठी शाहिरी रचनेत अनेक शाहिरांनी आपले योगदान दिलेले असून सुरवातीच्या काळात शाहिरांनी राजे, सरदार व गुणसंपन्न व्यक्तीचे गोडवे गायिलेले दिसून येते. यासाठी त्यांनी पोवाड्यातून तर कधी जनसामान्यांना आवडणार्या लावण्या रचलेल्या आहेत. परंतु स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात शाहिरांनी कला पथकाद्वारे खुप मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्व सामान्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्योत्तर काळात आंबेडकरी जलसेनीसुद्धा जनजागृती केलेली दिसते हे शाहिरी रचनेचे खुप मोठे यश आहे. त्याचप्रमाणे यातून शाहिरी रचनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून या रचनेला प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. खुप छान मांडणी... धन्यवाद ???????? -- Gajanan Jadhav
 19. वयम् - नववर्ष स्वागताच्या तऱ्हा

   

  विविध देशातील नववर्ष स्वागताच्या तऱ्हा वाचून गंमत वाटली.. मनुष्य स्वभाव सर्वकडे सारखाच... --
 20. मराठी प्रथम - शब्दांच्या पाऊलखुणा - पेवात पडणे (भाग - २०)

   

  मस्त.. पेव फुटणे हा एकच वाक्प्रचार माहित होता. त्याचा अर्थ देखील लक्षात आला असला तरी पेव म्हणजे काय? हे तर माहित नव्हतेच, पण हा प्रश्न देखील पडला नाही हे मान्य करायला हवे.. "पेव" बद्दल सविस्तर माहिती मिळाली.. आभार.. --
 21. पुनश्च - ओढा

   

  अप्रतिम! हे सारे म्हणजे पुन्हा एकदा प्रत्यय घेण्याचा आनंद आहे .. -- Anant Tadvalkar
 22. पुनश्च - दिवाळी अंक- १९४७

   

  छान लेख आहे. -- साधना गोरे
 23. पुनश्च - कृष्णराव मराठे

   

  लेख उत्तम.. कृष्णराव मराठ्यांविषयी चांगली माहिती मिळाली.. कृष्णराव मराठ्यांचे “पराक्रम” वाचले होते.. त्यावरून हे गृहस्थ “तापट आणि चक्रम” असावेत असा माझाही ग्रह झालेला होता.. ते सोबत भिंग घेऊन फिरत असावेत असेही वाटले होते.. तथाकथित अश्लील साहित्य वाचून ह्या गृहस्थांच्या “तळपायाची आग मस्तकात” पोहोचत असेल अशीही शंका होती.. पण लेखात म्हटले आहे की “स्वारी अगदी थंड वृत्तीची असून प्रतिस्पर्ध्याशी खेळीमेळीने दोन हात करायला एका पायावर तयार असते”.. हे वाचून गंमत वाटली.. गैरसमजही दूर झाला.. --
 24. पुनश्च - कृष्णराव मराठे

   

  लेखाच्या प्रस्तावनेमधे म्हटल्याप्रमाणे लेख माहीतीपूर्ण व मनोरंजक देखील आहे. त्याकाळात प्रसारमाध्यमे नसताना याप्रकारे विरोध प्रदर्शित करणे व त्यामध्ये सातत्य ठेवणे खूपच कठीण होते. -- hemant marathe
 25. पुनश्च - ती मंगलाष्टके अन् ते श्लोक

   

  मस्त ! खूपच सुंदर शैलीत लिहिले आहे. खुसखुशीत लेख वाचल्याचे समाधान मिळाले . -- CHARUDATTA SHENDE
 26. ललित - रूप पाहता लोचनी

   

  फारच सुंदर लेख -- Chandrakant Chandratre
 27. वयम् - शब्दांच्या जन्मकथा : वाचन

   

  मला हा लेख खूप आवडला.शब्द कसे निरनिराळ्या ठिकाणी आपले अर्थ घेवून येतात.हे फार छान सांगितलं आहे. -- Ashwini Barve
 28. पुनश्च - ब्राह्मण (कथा-ऑडीओसह)

   

  छान कथा -- suhasnannajkar07@gmail.com
 29. ललित - रूप पाहता लोचनी

   

  फारच छान! वाचनसंस्कृतीचे मर्म उलगडले आहे या लेखातून! -- bookworm
 30. मराठी प्रथम - बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध-अशुद्धता (भाग- २)

   

  सर, इथे ‘आले’ आणि ‘हंबरले’ या दोन शब्दांचा एकमेकांशी काही संबंध आहे, असं मला वाटत नाही. पण ‘आले’ या शब्दाबाबतच सांगायचं झालं तर, शब्द सारखाच असला तरीही त्याचं लिंग, वचन आणि तो वापरण्यामागची भावना बदलू शकते. ‘आज बाबा लवकर घरी आले’, या वाक्यातील ‘आले’ शब्द आदरार्थी, पुल्लिंगी, एकवचनी आहे. ‘आमच्या घरी पाहुणे आले’, या वाक्यातील ‘आले’ शब्द अनेकवचनी आहे; तसेच पाहुणे पुरूष आहेत की स्त्री आहेत याचं स्पष्टीकरण वाक्यात नसल्याने ‘ते’ असं नपुसकलिंगी सर्वनाम गृहीत धरून ‘आले’ शब्द वापरला आहे, असंही म्हणता येईल. ‘मी आली’ आणि ‘ती आली’ या दोन्ही वाक्यांबाबत सांगायचं तर, इथेही एकच शब्द भिन्न अर्थाने दोन वाक्यांत वापरला आहे, असं म्हणता येईल. पण यामुळे मराठी भाषेला एक क्रियापद गमावावं लागेल. मराठीत मुलग्यांसाठी ‘मी आलो’ आणि ‘तो आला’ अशी दोन क्रियापदं आहेत, तशीच मुलींसाठीसुद्धा ‘मी आले’ आणि ‘ती आली’ अशी दोन क्रियापदं आहेत. ती आपण जपली पाहिजेत. इथे 'आले' हा शब्द एकवचनी स्त्रीलिंगी ठरतो. – नमिता धुरी -- नमिता धुरी
 31. मराठी प्रथम - बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध-अशुद्धता (भाग- २)

   

  माझ्या ‘मराठी शाळा नेमक्या इथेच चुकतात’ या लेखात मी एक वाक्य वापरलं आहे. ‘बोलणे आणि म्हणणे यातला फरक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनीच संपवला’. बोलणे आणि म्हणणे या शब्दांमध्ये सूक्ष्म फरक आहे. तो समजून घेण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करते, इतरांनीही प्रयत्नपूर्वक योग्य शब्द वापरावा, अशी अपेक्षा आहे. आपण भाषा बोलतो… म्हणत नाही. पण आई लहान बाळाला सांगते, ‘बाबू आई बोल, आई बोल’. इथे ‘आई म्हण’ असं अपेक्षित आहे. इथे ‘जेते’ म्हणजे नेमके कोण ते कळेल का ? त्यांना आपण जेते का ठरवलं हे कळेल का ? ‘जेत्यांची भाषा शुद्ध ठरते’, या गैरसमजातून आधी आपणच बाहेर पडलं पाहिजे. सुरूवातीचे दोन परिच्छेद पुन्हा वाचावेत, ही विनंती. बाकी, ‘ज्यंतू’ हा शब्द कशासाठी लिहिला आहे ते कळलं नाही. -- नमिता धुरी
 32. मराठी प्रथम - बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध-अशुद्धता (भाग- २)

   

  मी आले नपुंसक लिंग वाटते. उदा वासरू हंबरले. --
 33. मराठी प्रथम - बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध-अशुद्धता (भाग- २)

   

  ज्यंतू , आम्ही अमुक बोलतो (म्हणतो नाही) ही प्रमाण भाषा व्याकरणशुध्द आहे का ? जेत्यांची भाषा शुद्ध ठरते. -- रत्नाकर मार्कंडेयवार
 34. पुनश्च - चाळ....शंभर वर्षांपूर्वी

   

  लिखाणाची भाषा खूप छान आहे -- hemant.a.marathe@gmail.com
 35. पुनश्च - कीर्तनातून मार्केटिंगचे आगळे तंत्र

   

  कैलास जीवन मलम आता घरोघरी आहे -- suhasnannajkar07@gmail.com
 36. पुनश्च - सुरती रुपया आणि यशाचे गणित (ऑडीओसह)

   

  छान हलका फुलका लेख आवडला . -- atmaram-jagdale
 37. पुनश्च - कथा : काळरात्र (ऑडीओसह)

   

  छान आहे धन्यवाद -- abhimandhawas3@gmail.com
 38. पुनश्च - माझ्या आनंदाचे निधान (ऑडीओसह)

   

  ना. सि. फडके यांना प्रत्यक्ष भेटले असल्यामुळे वाचताना तेच बोलत असल्याचे जाणवले आणि एकूण सगळेच भावले, धन्यवाद -- suuniitii@gmail.com
 39. पुनश्च - वाईः ७० (१२५) वर्षांपूर्वी

   

  125 वर्षापूर्वीचे समाजजीवन कस होतयाची कल्पना करता आली. 50 वर्षापूर्वी अनुभववलेले कोकणातले उत्सव आठवले. -- sugandhadeodhar
 40. पुनश्च - कथा - सौदा (ऑडीओसह)

   

  सुरवात केली आणि गोष्टीत सामील झालो . -- sondara.sudam@gmail.com
 41. वयम् - मानवा, सोड तुझा अभिमान

   

  निसर्ग जगण्याची कला देऊन जन्माला घालतो, उपयोग करता आला पाहिजे. उत्तम माहिती -- anantrao
 42. पुनश्च - अश्रू झाला आहे खोल...

   

  शुर मर्दाचा पोवाडा शुर मर्दाने गावा. तसा हा लेख. -- chandratre_adv@yahoo.co.in
 43. पुनश्च - वाईः ७० (१२५) वर्षांपूर्वी

   

  अप्रतिम शब्दांकन ... तो काळ साक्षात डोळ्यासमोर उभा राहिला !!! -- vivekvaidya1878
 44. पुनश्च - वेळ झाली निघून जाण्याची...

   

  खुप सुंदर मांडणी, भटांच्या गझला चे आशय, त्यांचे स्वभाव वर्णन अत्यंत बोलक्या शब्दात मांडले .खुप आवडले! -- drmayakamble@gmail.com
 45. पुनश्च - कथा - सौदा (ऑडीओसह)

   

  वाहवा -- mukunddeshpande6958@gmail.com
 46. पुनश्च - कथा - सौदा (ऑडीओसह)

   

  क्या बात है, सुंदर क्लायमॅक्स. -- dhananjay
 47. पुनश्च - अर्पणपत्रिकांची झाडाझडती

   

  लेख छान पद्धतीने मांडला आहे. हा एक चांगला संशोधनाचा विषय होऊ शकतो. -- jrpatankar
 48. पुनश्च - अनंत काकवा प्रियोळकर

   

  तेथे कर माझे जुळती. -- jrpatankar
 49. पुनश्च - कथा - सौदा (ऑडीओसह)

   

  अप्रतिम धक्कतंत्र! -- nitinddhage
 50. पुनश्च - कथा - अक्का (ऑडीओसह)

   

  लेख भावना विभोर करणारा आहे,,मन विषण्ण झाले -- arun_msawkare@rediffmail.com
 51. पुनश्च - अ.भि.शहाः माणसं स्थापन करणारी संस्था

   

  हा लेख दिल्याबद्दल धन्यवाद. शहांची स्मृती चिरंतन होणे आवश्यक आहे. वर्षाकाठी त्यांच्या नावे व्याख्यानमाला वगैरे व्हायला हवी. -- Sunanda
 52. पुनश्च - माझी साहित्यिक धूळपाटी (ऑडीओसह)

   

  गंगाधर गाडगीळ ,मला एम ए ला स्पेशल ऑथर म्हणून होते. त्यांच्या एकांकिका आम्ही बी एड च्या वर्गात सादर केल्या आहेत .मी कसा झालो? कऱ्हेचे पाणी ही आचार्य अत्रे यांचेग्रंथ वाचले होते.आटोपशीरपणे गंगाधर गाडगीळ यांनी आपण लेखक म्हणून कसे घडलो ,हे या लेखात मांडले आहे.अनेकांना हे लेखन वाचून लेखक कसा तयार होतो हे समजेल. -- sumamata@gmail.com
 53. मराठी प्रथम - शब्दांच्या पाऊलखुणा - पण घोंगडी मला सोडत नाही (भाग - तेरा)

   

  किती सुंदर लेख. ' भिजत घोंगडे' हे किती सर्रास वापरतो आपण. पण त्यामागची ही कहाणी किती रोचक आहे... घोंगड्याला एक विशिष्ट गौध असतो. तो चिंचोक्याच्या खळीचा असावा, हे आता कळलं. किती जवळच नांदत असतात ह्या गोष्टी पण त्यांबद्दल माहित नसते आपल्याला काही...धन्यवाद ह्या लेखाबद्दल. -- चिन्मयी सुमीत
 54. पुनश्च - कथा - अक्का (ऑडीओसह)

   

  खूप सुंदर. बालविधवांच्या व्यथा नेमक्या शब्दांत मांडल्या आहेत. -- shripad
 55. पुनश्च - आमचे शत्रू आम्हीच

   

  तडाखेबंद लेखणी..आजही तेवढीच गरज आहे, तरूणाईच्या धमन्यात जोश भरण्याची..आणि काही कलाकृती सार्वकालिक अजरामर का ठरतात, ते हा लेख शिकवितो. आमच्या अधःपतनाला आम्ही जबाबदार..! हे एकदा उमगले, की त्याबाहेर निघण्याची दिशा सापडते आणि आत्मविश्वास निर्माण होतो..! हेच या लेखाचे, त्याच्या टवटवीत असण्याचे गमक आहे. -- daherenkoji@gmail.com
 56. पुनश्च - कथा : काळरात्र (ऑडीओसह)

   

  कथा व्यवस्थित ठिकाणी सम्पवली आहे. सर्व पर्याय खुले आहेत. चित्रकार आपल्या घरी परत जाईल आणि दोघेही आश्चर्य करीत हा प्रसंग आठवत राहतील . -- advshrikalantri@gmail.com
 57. पुनश्च - भाऊराव माडखोलकर : एक बहुपेडी व्यक्तिमत्व

   

  माडखोलकरांबद्दल पश्चिम महाराष्ट्रात आदर असला तरी माहिती कमी आहे, हा लेख वाचून छान वाटलं. -- hpkher
 58. पुनश्च - इदंमम शरीरं

   

  अद्भुत लेख आहे...स्वप्न आणि जागृतीच्या सीमेवर आणि समेवर लिहिलेला..एखादं abstract शिल्प किंवा painting असावं तसा.. सगळंच कळत नाही पण अनिर्वचनीय अनुभूती मात्र येते... -- 9423584026
 59. पुनश्च - धुम्रपानाविरुद्धची माझी 'मैत्रीपूर्ण' लढाई (ऑडीओसह )

   

  छान आहे लेख . विशेषतः लेखकाच्या तरुणपणातील परदेशी शिक्षणातील अनुभव अगदी मनमोकळेपणाने त्यांनी सांगितले आहेत .मानवी जीवनातील काही शाश्वत मूल्य जगाच्या पाठीवर कुठेही गेल तरीही थोड्या फार फरकाने सारखीच प्रत्ययाला येतात हे काही खोटं नाही . -- atmaram-jagdale
 60. पुनश्च - इदंमम शरीरं

   

  अतिशय सुंदर असा लेख ! बऱ्याच दिवसानंतर वाचनामध्ये आला . खरं आहे आपलं शरीर आपल्या सोबत असत . आणि जाणीवपूर्वक आपण त्याची दखल घेत नाही . काही दुखलं-खुपलं आजारपण आलं , की आपल्याला आपल्या शरीराची जाणीव होते . खरंतर आपल्या शरीराशी आपण वेळोवेळी संवाद साधला पाहिजे . लेखकाने अतिशय तरलपणे आणि नाविन्यपूर्ण मांडणी करून या गोष्टी सांगितल्या आहेत .आवडल्या . जुन्या मधील असेच चांगले लेख वेळोवेळी वाचण्यासाठी पुरवावेत अशी आपल्याला विनंती आहे . -- atmaram-jagdale
 61. मराठी प्रथम - एका खेळणाऱ्या मुलीला...

   

  वैशाली ताई, खुप खुप कौतुक... अप्रतिम अनुभव आपण मांडलेला आहे... आपले नाव आणि हा प्रसंग नेहमी लक्षात राहील... -- pmadhav
 62. पुनश्च - अन्नदान (ऑडीओसह)

   

  शेवटचं वाक्य लय भारी ,कथासारच ते ! -- benodekarabhinav@yahoo.com
 63. पुनश्च - मी लेखक कसा झालो ( ऑडीओसह )

   

  आतिषय सुंदर असा लेख वाचायला मिळाला . लेखक कसा घडत जातो ' याचं मार्गदर्शनच लेखकाने घडवलं . आमच्या सारख्या सैरभैर वाचन करणाऱ्या वाचकांनी कोणत्या तरी एका स्थितीला लिहायला हवं म्हणजे वाचकाची वाटचाल लेखकाकडे होईल . किमान मागच्या पिढीतील लेखकांच्या प्रेरणा आणि त्यांचा भोवताल खूपच अनुकूल होता . एकंदरीत लेख आवडला . गाडगीळांची फक्त दोनच पुस्तके वाचायला मिळाली ती म्हणजे तलावातील चांदणे आणि दुर्दम्य ! -- atmaram-jagdale

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.